Monday, December 7, 2009

E-Lokshahi Din

दैनंदिन ई-लोकशाही दिन
www.Kolhapur.nic.in
महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा स्तरावर दर बुधवारी तालुका स्तरावर लोकशाही दिन संपन्न होतो. त्यावेळी सर्व विभागप्रमुख हजर असतात व त्याच्या समवेत चर्चा करुन नागरिकांची समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो व साधारणपणे एका महिन्यात त्याचे निराकारण केले जाते.
पण त्यासाठी नागरिकांना दूर दूर गावातुन जिल्हा वा तालुका मुख्यालयी यावे लागते व त्यासाठी वेळ व प्रवास खच त्याना द्यावा लागतो. पुन्हा जिल्हा व तालुक्यातील गांवाची संख्या व नागरिकांची सख्या पाहता एक दिवस कमी पडतो. पुन्हा अधिका-यांची वेळ मर्यादा – तीन चार तास पहाता साधारणपने पन्नास ते पच्याहत्तर नागरिकाच्या तक्रारी निटपणे ऐकता येतात. यामुळे सवाचे समाधान होऊ शकत नाही.
त्यावर नवा अभिनव् तक्रार निवारणाचा व चोख समाधनाचा उपाय म्हणजे कोल्हापुर जिल्हाधिका-यांची “दैनंदिन 'ई' लोकशाही दिन" उपक्रम होय. येथे आपण दररोज केव्हाही आपली तक्रार नोदवु शकता, गा-हाणे मांडु शकता, सुचना व माहीती जिल्हा प्रशासनास देऊ शकता, ते ही आपलं गाव न^ सोड्ता. यामुळे आपला वेळ व प्रवास खर्च वाचणार आहे. पण त्याही पेक्षा आपण केलेल्या तक्रारी बाबत अधिकारी काय करतात हे ही आपण पाहु जाणु शकणार आहे. ते शक्य होणार आहे ईलेक्ट्रोनिक माध्यमाद्वारे इंटरनेट व ई-मेल द्वारे.
दैनंदिन ई लोकशाही दिन म्हणजे काय ?
कोल्हापुर जिल्हाधीकारी कार्यालयाची वेबसाईट संकेतस्थळ आहे. त्याचा पत्ता आहे.
या पत्यावर कोणताही नागरिक भेट देऊ शकतो व ई लोकशाही दिन या आयकॉनवर क्लिक करुन तेथे आपली तक्रार, गा-हाणे वा सुचना नोदवु शकतो. आणि ई मेल द्वारे पाठवू शकतो.ज्याच्याकडे सगणक व इटरनेट ची सुविधा उपलब्ध नाही. ते गावात सुरु झालेल्या किवा होणा-या ई महा सेवा केंद्रावर किवा कोण्त्याही सायबर कँफेवर जाऊन तेथील चालकाच्या मदतीने ई मेल द्वारे आपली तक्रार नोंदवु शकतो. आपणास दुस-या दिवशी म्हणजे 24 तासात त्याची पोहोच मिळु शकते.
जिल्हाधिकारी कोल्हापुर कायर्यालयात एक खास सगणक विभाग दररोज दहा ते सहा कार्यरत असेल व त्याचा इटरनेट चालु असेल. आपला ई मेल या काळात आल्यास तात्काळ तो दिसेल व त्याची त्वरेने पोहोच अवघ्या एका तासाच्या आत दिली जाईल. जर नागरिक दहा ते सहा वेळेच्या व्यतिरिक्त ई मेल व्दारे तक्रार नोदवणार असतिल तर दुस-या दिवशी त्याना पोहोच मिळेल.
तसेच प्रत्येक ई मेल मधिल तक्रार लशात घेवुन ती संबंधित अधीकारी कार्यालयाकडे सुस्पष्ट आदेशासह पाठवली जाईल व तक्रादाराचे काम केव्हा पुण होईल याची एक तारीख दिली जाईल. त्या तारखेस संबंधित अधिकारी तक्रारदारास ई मेल द्वारे उत्तर पाठवतील, तसेच टपालानेही उत्तर त्याच्या पत्यावर पाठवतील. आणि त्याचे पुण समाधान होईल अशा पध्द्तीने कार्यवाही केली जाईल.
जिल्हाधिकारी कार्यालयामाफत दररोज याचा आढावा घेतला जाईल व संबधीत अधिका-यांना ई मेल द्वारे स्म्ररणपत्र पाठवले जाईल. तसेच दर महिन्याच्या नेहेमिच्या लोकशाही दिनाच्या वेळी आढावा घेतला जाईल. प्रत्येक नागरीकास आपल्या तक्रारीची सदस्थिती पहायला मिळेल.
हा अभिनव नागरिकांच्या सोईचा उपक्रम दिनाक 7 डिसेबर 2009 च्या लोकशाही दिनापासुन सुरु करण्यात येत आहे. याची माहिती सर्वांना व्हावी म्हणुन एक माहितीफलक प्रत्येक तहसिल, पंचायत समिती व सर्व जिल्हा तालुका उपविभागीय कार्यालयात लावला जाईल. तसेच प्रत्येक गावाच्या ग्रांमप्चायत व तलाठी कार्यालयात लावला जाईल.तरी नागरीकानी ई लोकशाही दिन उपक्रमाचा फायदा घ्यावा व गावातुन तक्रार नोदवुन आपला वेळ खर्च वाचवावा. आम्ही असे अभिवाचन देतो की आपला प्रत्येक ई मेल तकारीचे 100 % निवारण होण्यासाठी सर्व संबधित अधिका-याकडे पाठपूरावा करु.

Friday, August 14, 2009

Swine flu

Swine flue is a respiratory disease of pigs. It was isolated in 1930. It is caused by Influenza type A which brings about the disease in pigs. This happens on a pretty regular basis and doesn’t cause many deaths in pigs. The pigs certainly get ill and it happens with a large number of pigs usually in the fall and winter months of the year. That is when most of the human population gets their versions of influenza injections as well, better known as “the flu shot”.Every year the flu vaccines that are received by humans are just a bit different. The virus used to make our flu injection is grown in a lab dish to make a vaccine that most likely matches the strain of the influenza that is expected that season. The strains of flu morph every season and although the symptoms of the flu are the same or mostly similar to the last year’s strain, the vaccinations can be targeted to the specific strain or species of the virus that will affect people that year. If a person get the vaccination and still gets ill with the flu it is said that it is possible the person got a strain of the flu that was more severe or not covered in the vaccination the person received. It is impossible to cover every variation of a virus that is continually changing.Viruses can change constantly and that is the same of the swine flu. Pigs can become infected with other viruses that have reassorted or “swapped genes” and a new strain of the virus is born. Pigs can get infected with avian (bird) flu, human and other strains of swine flu from other pigs too and then the reassorting/ gene swapping begins again creating a new subtype of that virus.There is a vaccine to protect pigs from the virus but currently no vaccine to protect humans from catching swine flu. A seasonal influenza vaccination grown and manufactured for humans will only partially protect a person. Since there are 4 substrains of swine influenza type A, the seasonal flu shot will give a person only partial protection from only one of the variations of the swine flu but not against the main species of the swine flu that we are seeing in the world news in the past week or so.The symptoms of swine flu closely mimic the symptoms of human influenza. Coughing, fever, runny nose, fatigue, headache and a loss of appetite are consistent with both human and swine influenzas. Additional symptoms which may require being seen by a physician include chills, nausea, congestion, sore throat, lethargy, a fever over 101 degrees, vomiting and diarrhea which can bring about dehydration and put the sick person at additional risk. This will usually land the person a night or two in the hospital with IV fluids and meds. Swine flu doesn’t usually infect humans but this does occur when a person has close proximity with pigs that are infected and then is around other people. The person can catch the swine flu virus from the pigs that are infected and it is then passed on from an infected person to others through coughing, sneezing and casual contact. Just as in human influenza, if a person touches something which has the flu virus on it and then touches their eyes, nose or mouth they can then contract that virus.With most viruses there is a window period called “shedding”. That would be the ideal time where sputum (a respiratory sample coughed up) is obtained and sent to the CDC for examination. During this shedding period, there has not been sufficient time for the body to send out any protection and the virus can be more readily identified. Shedding a virus is much like shedding old dead skin cells and can easily spread a virus during that time frame. For adults shedding a virus occurs most likely 4-5 days after the infection is received. The antigen can be identified most easily during that window period of shedding.When an antigen, the invader disease state that infects the person, enters the body, there is an antibody response to that antigen or invader. That is when our little soldier cells (white cells) respond to the invading infection and build more and more little soldier cells to fight the infection. Children may shed longer due to decreased antibody loads due to age or vaccinations received thus far in their little lives. This antigen/ antibody response usually takes care of the invader and we get better but those persons who are compromised health wise have a much harder time of it. Persons with compromised pulmonary functions, diseases that do not allow for full recovery such as HIV and cystic fibrosis are also at increased risk and should take all precautions to avoid catching swine flu.

So how do we as a community protect ourselves against the swine flu?

Education. Education. Education!!!!!!
Every year Health Departments around the country preach the gospel of Good Community Health through hand washing, cough control and sneeze protection for those around us. These are the 3 main things a person can do to protect themselves from almost any invader disease state. Just like condoms add barrier protection for those who use them, we, as a community, are asked to make a barrier of our own sniffles and sneezes to avoid passing our germs to the next person. Make it a practice to wash hands often, especially with children who don’t think to wash their hands and often share toys, food and germs. As adults it is necessary for us to make good examples of ourselves and teach our children good hand washing practices to avoid spreading diseases. This applies to avoiding passing a cold to avoiding passing on swine flu. Carry hand sanitizing gels or wipes if you feel you will be where there may not be adequate facilities for hand washing. Kleenexes now come in varieties where they capture germs on the tissues and the germs are disposed with the tissues. Zinc is always a good option for staying healthy. Sleep and a proper diet can also help, but barrier methods and cleanliness work the best for not passing on germs and infections.If you or a loved one comes down with an illness that you suspect could be the swine flu it may be best to see a physician if the symptoms begin to mimic a worse illness than just a regular flu. If there is fever, persistent coughing that sounds like a barking, fever, vomiting or diarrhea, go to a healthcare professional and get checked out. An ounce of prevention is worth a lot in this situation, but when that fails, is there a pound of cure to be had?Testing has shown that the human swine influenza H1N1 (the main strain of swine influenza) can be treated with the antivirals oseltamavir (Tamiflu) and zanamivir (Relenza). If you suspect you may have had contact with someone who has any symptoms of the swine flu it may be necessary to be on antiviral therapy to avoid spreading the disease and to recover. If there are any further questions or concerns about the state of your health and swine flu, please contact your healthcare professional for early treatment.

Friday, March 13, 2009

निवडणूक 2009

मा.जि‍ल्‍हाधि‍कारी, कोल्‍हापूरच्‍या http://collectorkolhapur.blogspot.com/ या ब्‍लॉगवर कोल्‍हापूर जि‍ल्‍ह्यातील सर्व नागरि‍कांचे स्‍वागत करतो. या ब्‍लॉगद्वारे जि‍ल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने, जि‍ल्‍हाधि‍कारी - जनतेचा सेवक (Public Servant) म्‍हणुन आपणापुढे प्रशासनाने हाती घेतलेले उपक्रम, कल्‍पना व इतर बाबी मांडणार आहे त्‍यावर आपली मते कोणीही नोंदवू शकतो. प्रत्‍येक मताची दखल घेऊन त्‍याच उत्‍तरही दि‍ले जाईल व हा मुक्‍त संवाद-वि‍चारांची देवाणघेवाण सतत सुरू ठेवली जाईल. या मागचा उद्देश प्रशासनातली पारदर्शकता जपणे व ती सर्व नागरि‍कांना अनुभवास येणे हा आहे. तरी आपले या ब्‍लॉगवर स्‍वागत आहे. वाट कसली बघता? आपण येथे आपल्‍या सूचना व कल्‍पना मांडू शकता. जि‍ल्‍हा प्रशासन प्रति‍क्षेत आहे.
लक्ष्मीकांत देशमूख, IAS
जिल्हाधिकारी, कोल्हापूर.
collectorkolhapur@gmail.com

Thursday, March 12, 2009

नि‍वडणूक आचार सं‍हि‍ता - नागरि‍कांचे कर्तव्‍य

दि‍नांक 2 मार्च 2009 रोजी भारतीय नि‍वडणूक आयोगाने लोकसभेच्‍या नि‍वडणुकीचा सार्वत्रि‍क कार्यक्रम जाहि‍र केला, त्‍या दि‍वसापासून आदर्श आ‍चार संहि‍ता लागू झाली आहे. या ब्‍लॉगवर त्‍याचा तपशि‍ल उपलब्‍ध आहे, तो आपण वाचावा. या पुरोगामी जि‍ल्‍ह्याचे नागरि‍क म्‍हणून कोल्‍हापूर, हातकणंगले लोकसभेची नि‍वडणूक ही नि‍ष्‍पक्ष व ‍नि‍र्भय वातावरणात पार पाडण्‍याचा ‍जि‍ल्‍हा प्रशासनाचा ‍नि‍र्धार आहे. पण नागरि‍क म्‍हणून आपले सहकार्य अपेक्षि‍त आहे. नव्‍हे, भारतीय घटनेने जे अधि‍कार आपणास ‍दि‍ले आहे, त्‍याची जपणूक करण्‍यासाठी कांही कर्तव्‍ये आपणही पार पाडायची आहेत. आपण आदर्श नि‍वडणुक आचारसंहि‍तेसाठी खालील बाबी पहाणे व त्‍याचा भंग झाल्‍यास जि‍ल्‍हा प्रशासनास कळव‍णे हे आपले कर्तव्‍य आहे ते आपण बजावल्‍यास आम्‍ही आपले आभारी राहू. आपण खालील बाबींकडे कृपया लक्ष द्यावे. 1. कोणत्‍याही सार्वजनि‍क ‍ठि‍काणी, उदा.चौक, रस्‍ते, वि‍द्युत खांबे इ. ठि‍काणी तसेच शासकीय, नि‍मशासकीय व सहकारी संस्‍थांच्‍या इमारतीवर कोणत्‍याही पक्ष वा उमेदवारास पोस्‍टर्स, फलक, झेंडे, बॅनर्स लावता येणार नाहीत. असा प्रकार आपणास आढळल्‍यास नि‍वडणूक शाखेस कळवावा. 2. नागरि‍कांच्‍या खाजगी घरावर त्‍यांच्‍या परवानगीने पोस्‍टर्स, बॅनर्स लावण्‍याची मुभा आहे, याचा कोणी भंग केला तर ते आचार संहि‍तेचे उल्‍लंघन ठरते. 3. नि‍वडणुक प्रचारात उमेदवारांनी तीनपेक्षा जास्‍त वहाने वापरणे, वाहनावर नि‍वडणुक शाखेची परवानगीचा फलक नसणे, सभेमध्‍ये मतदारांना आमि‍ष दाखव‍णे, चहा-पान, भोजन देणे असे प्रकार आपल्‍या नजरेस आले तर आपण आम्‍हास त्‍वरीत कळवा. 4. कोणत्‍याही उमेदवारास प्रचार करताना वैयक्ति‍क चि‍खलफेक, जात-धर्माचा आधार घेऊन भावना चेतवि‍णे करण्‍यास नि‍वडणूक आयोगाची सक्‍त मनाई आहे. आपण नागरि‍क म्‍हणुन जेव्‍हा पक्ष उमेदवारांच्‍या सभांना जाल, तेव्‍हा असे कारण कोणी केले तर आम्‍हास कळवावे. या चार बाबींबाबत एक नागरि‍क व लोकशाही मानणारा जबाबदार मतदार म्‍हणुन आपले कर्तव्‍य आहे की, या बाबी नि‍वडणूक शाखेस कळवाव्‍यात. त्‍यासाठी खाली टेलि‍फोन व मोबाईल नंबर दि‍ला आहे व E-mail ID दि‍ला आहे त्‍यावर आपण याबाबत माहीती कळवावी. P. A. to Collector (श्री.मि‍साळ) 2654811 / 2666751 /9890906535 (श्री.अशोक वायचळ) लि‍पि‍क 9420775762 अप्‍पर जि‍ल्‍हाधि‍कारी, श्री.तुकाराम कासार 2657855 / 9422519536 नि‍वासी उपजि‍ल्‍हाधि‍कारी, श्री.अजि‍त रेळेकर 2654812 /9922298399 उपजि‍ल्‍हा नि‍वडणूक अधि‍कारी, श्री.शि‍वाजीराव कादबाणे कार्या-2658316 नि‍वास-2665393 / 9422015691 नि‍वडणूक शाखा, 2658316